अगत्य यावे.. मोफत वैरण वाटप प्रारंभ...

चारा छावणी ची अव्यवहरिता लक्ष्यात घेऊन शासनाने कमकुवत घटकाला ज्याप्रमाणे रेशनकार्डावर अन्नसुरक्षा दिली जाते.त्याप्रमाणे चारा सुरक्षा कार्डावर वैरण पुरवून दुष्काळ ग्रस्तांना चारा सुरक्षा दिली जावी अशी मागणी आपण करत आहोत. हे व्यवहारिक दृष्ट्या शक्य आहे.हे दर्शवण्यासाठी हिवरे,सुलतानगादे,खरसुंडी व घुटुकडे वस्ती येथील शेतकऱ्यांना रेशनकार्ड व्यवस्थेप्रमाणे चारा सुरक्षा कार्डाद्वारे एक महिनाभर आपण मोफत चारा वाटप करणार आहोत... या शुभारंभ कार्यक्रमास आग्रहाचे निमंत्रण.. @ 8 ऑगस्ट 2019 क्रांतीवन बलवडी

उगम फौंडेशन बलवडी यांचे तर्फे जांभूळणी ता. आटपाडी येथे महाराष्ट्रातील पहिल्या चारा दान केंद्राची दि. 6 मे 2019 रोजी सुरुवात झाली..!
धर्मादाय आयुक्त सांगली प्रोत्साहित
उगम फौंडेशन बलवडी यांच्या वतीने पुण्यकर्म चारा दान केंद्र

पुण्यकर्म चारा दान केंद्र pdf फाईल डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

क्रांतीवनात गटशेती कार्यशाळा संपन्न

11-13 मे 2019


येरळानदी काठावर वसलेल्या बलवडी भा.(ता. खानापूर ) येथील क्रांतीस्मृतीवनात प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास महाअभियान अंतर्गत MSDP सर्कल मध्ये तीन दिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. यावेळी कृषी उत्पन्नबाजार समितीचे माजी सभापती सुशांत देवकर सरपंच प्रविण पवार संग्राम जाधव संपतराव पवार , उपसरपंच प्रसाद पवार मनोहर चव्हाण, प्रा. विश्वनाथ गायकवाड उपस्थित होते.
श्री. देवकर म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची गटशेतीतून आर्थिक व सामाजिक प्रगती साधण्यासाठी हे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. या प्रशिक्षणातून लहान शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत होणार आहे. तसेच शेतकऱ्यांचा गट स्थापन करुन कंपनी निर्माण करण्यासाठी प्रयत्न या प्रशिक्षणातून होणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी जास्तीतजास्त या प्रशिक्षणात सहभाग घेऊन संपतराव पवार म्हणाले महाराष्ट्रात सर्वत्र हे प्रशिक्षण मंडल स्तरावर घेण्यात येत आहे.
समुह शेती, गटशेती माध्यमातून उस व द्राक्षे उत्पादकांना पोषक व शेतीमध्ये प्रगती करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. लहान शेतकरी हा सदन व सक्षम व्हावा शेतीमध्ये आधुनिकता आणून शेतीमध्ये आर्थिकदृष्ट्या प्रगती साधण्यासाठी हे प्रशिक्षण घेतले आहे. गावागावामध्ये शेतीसाठी या प्रशिक्षणातून एकात्मता साधली जात आहे. संघटीत होवून शेती केल्यास आपली आर्थिक उन्नती निश्चित आहे असे प्रभावी मार्गदर्शन केले. दोन सत्रामध्ये हा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. यावेळी प्रशिक्षण सदन घड्याळे यांनी गटशेतीस आवश्यक सर्व महत्त्वाची माहिती प्रेझेंटेशनद्वारे शेतकऱ्यांना दिली. तीन दिवशीय प्रशिक्षणानंतर आठ आठवड्यांचा जोड कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यावेळी संपतराव पवार, ग्रामसेविका पल्लवी नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेस प्रगतशिल शेतकरी रघुनाथ पवार मारूती पवार मानसिंग जाधव बाबुराव पवार आनंदराव पवार देवकुमार दुपटे अमीर सय्यद प्रकाश जाधव धनाजी जाधव अनिल दुपटे बी.डी.कुंभार आर. एन. कास्कर अभिजीत पवार कपिल पवार विलास गोरड खंडेराव जाधव राजेंद्र पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. समन्वयक स्वागत व प्रास्ताविक दीपक पवार यांनी दिली . आभार अशोक पवार यांनी मानले. यावेळी बलवडी तांदळगाव जाधवनगर आळसंद परिसरातील शेतकरी उपस्थित होते. चोकट : अनोखे उदघाटन क्रांतीस्मृतीवनात झालेल्या गटशेतीचेउदघाटन अनोखे पद्धतीने झाले. कोरडवाहू शेतकर्यांचे कैवारी डाॅ. अण्णासाहेब शिंदे यांच्या स्मृती वृक्षास पाणी घालून गटशेतीचे उदघाटन झाले.

PunyaKarma
 वैरण निर्मिती प्रकल्प
 वैरण निर्मिती प्रकल्प वैरण निर्मिती प्रकल्प  वैरण निर्मिती प्रकल्प
 वैरण निर्मिती प्रकल्प

महिलांनी चालवलेले पहिले चारा दान केंद्र.. दि ६ मे 2019 रोजी जांभुळणीत 'पुण्यकर्म' चारा दान केंद्र सुरू झाले. जनावरांच्या...

Posted by अॅड.संदेश पवार on Tuesday, 21 May 2019
वैरण निर्मिती प्रकल्प
 वैरण निर्मिती प्रकल्प
वैरण निर्मिती प्रकल्प
राज्य शासन निधी

पुण्यकर्म चारा दान केंद्र

Click on the images to enlarge them.


BLOG KRANTIVAN

Click on Details to see full Post.

our mission

Empower farmers who are otherwise forced to work as farm labours due to non availability of water resources.

Read more

Make donations

Please Participate with generous interaction in this process of sustainable development.

Read more

Help & support

Helping one person might not be change the Whole World But it could change the world of one person.

Read more

our programs

We take initiate in Water Management, Agriculture with low Investment and Good Returns, Organic Farming.

Read more

News Coverage

Posted by अॅड.संदेश पवार on Monday, 15 August 2016

Tyre Dam

भाई संपतराव पवार यांच्या प्रयत्नातून पेठ येथे उभे राहत असलेले कर्मयोगी बाबा आमटे स्मृती धरण

Posted by अॅड.संदेश पवार on Tuesday, 2 May 2017

Our Work

WE Care !!!

Let's Make Dam

We fight together

' समाजभान अभियान अंतर्गत बैठकीसाठी मा. कौस्तुभ आमटे व अॅड. संदेश पवार क्रांतीवनात....'