Krantivan -चारा दान केंद्र व चाराछत्र उपक्रम

महाराष्ट्रातील तमाम कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासाला दिशादर्शक ठरू शकणारा मार्ग

चारा दान केंद्र व चाराछत्र उपक्रम

सस्नेह नमस्कार,

      शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मूलभूत तोडगा काढण्याऐवजी शेतकऱ्यांना कायम याचक बनवून त्यांच्यावर राज्य करण्याच्या धोरणाविरोधात गेली चाळीस वर्षे आपण झुंजत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आपण यंदा चारा दान केंद्र व चाराछत्र उपक्रम राबवले.कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आयुष्याशी अदृश्यपणे जखडून ठेवलेल्या गुलामीची कडी तोडण्याचा हा छोटासा प्रयत्न होता.आपल्या अमूल्य सहकार्यामुळे तो यशस्वी झाला. या उपक्रमास आपण उदार अंतःकरणाने केलेल्या मदतीमुळे दुष्काळात खऱ्या गरजू शेतकऱ्यांचा दावणीला तडफडत असणाऱ्या तीन हजार सातशे जनावरांना आपण चारा पुरवू शकलो.. यात काही चुका झाल्या असतील तर त्या आमच्या आहेत.आपल्या मार्गदर्शनाने यापुढे त्या सुधारण्याचा नक्की प्रयत्न करू! या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासाला दिशादर्शक ठरू शकणारा मार्ग समोर आला आहे.तो प्रशस्त होईल अशी आशा करूया! सहृदयी सहकार्याबद्धल पुनश्च आभार!! आ.कृपाभिलाशी अॅड संदेश पवार,कार्यवाह उगम फौंडेशन बलवडी ता.क.सोबत अवलोकणार्थ उपक्रम अहवाल सादर करीत आहे.चाराछत्र अहवाल PDF