Ugam Foundation conducted 3-day Group Farming Workshop recently in Kranti-Smriti-Van under Prime Minister Skill Development Programme & in association with Chhatrapati Rajaram Maharaj Entrepreneurship & Skills Development Scheme (MSDP Circle).Ex-Charman of APMC Sushant Deokar, Sarpanch Pravin Powar, Deputy Sarpanch Prasad Pawar & other social digitaries like Sangram Jadhav, Manohar Chavan & Prof Vishwanath Gaikwad were present

श्री. देवकर म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची गटशेतीतून आर्थिक व सामाजिक प्रगती साधण्यासाठी हे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. या प्रशिक्षणातून लहान शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत होणार आहे. तसेच शेतकऱ्यांचा गट स्थापन करुन कंपनी निर्माण करण्यासाठी प्रयत्न या प्रशिक्षणातून होणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी जास्तीतजास्त या प्रशिक्षणात सहभाग घेऊन संपतराव पवार म्हणाले महाराष्ट्रात सर्वत्र हे प्रशिक्षण मंडल स्तरावर घेण्यात येत आहे.
समुह शेती, गटशेती माध्यमातून उस व द्राक्षे उत्पादकांना पोषक व शेतीमध्ये प्रगती करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. लहान शेतकरी हा सदन व सक्षम व्हावा शेतीमध्ये आधुनिकता आणून शेतीमध्ये आर्थिकदृष्ट्या प्रगती साधण्यासाठी हे प्रशिक्षण घेतले आहे. गावागावामध्ये शेतीसाठी या प्रशिक्षणातून एकात्मता साधली जात आहे. संघटीत होवून शेती केल्यास आपली आर्थिक उन्नती निश्चित आहे असे प्रभावी मार्गदर्शन केले. दोन सत्रामध्ये हा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. यावेळी प्रशिक्षण सदन घड्याळे यांनी गटशेतीस आवश्यक सर्व महत्त्वाची माहिती प्रेझेंटेशनद्वारे शेतकऱ्यांना दिली. तीन दिवशीय प्रशिक्षणानंतर आठ आठवड्यांचा जोड कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यावेळी संपतराव पवार, ग्रामसेविका पल्लवी नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेस प्रगतशिल शेतकरी रघुनाथ पवार मारूती पवार मानसिंग जाधव बाबुराव पवार आनंदराव पवार देवकुमार दुपटे अमीर सय्यद प्रकाश जाधव धनाजी जाधव अनिल दुपटे बी.डी.कुंभार आर. एन. कास्कर अभिजीत पवार कपिल पवार विलास गोरड खंडेराव जाधव राजेंद्र पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. समन्वयक स्वागत व प्रास्ताविक दीपक पवार यांनी दिली . आभार अशोक पवार यांनी मानले. यावेळी बलवडी तांदळगाव जाधवनगर आळसंद परिसरातील शेतकरी उपस्थित होते. चोकट : अनोखे उदघाटन क्रांतीस्मृतीवनात झालेल्या गटशेतीचेउदघाटन अनोखे पद्धतीने झाले. कोरडवाहू शेतकर्यांचे कैवारी डाॅ. अण्णासाहेब शिंदे यांच्या स्मृती वृक्षास पाणी घालून गटशेतीचे उदघाटन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *