भाई संपतराव पवार व नितीनजी भिडे, पुणे यांच्या प्रेरणेने उगम फौंडेशन या संस्थेच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून बलवडी, जाधवनगर व तांदूळगाव परिसरात FIGHT AGAINST COVID हा उप्रकम राबवत आहोत. परिसरातील अत्यवस्थ कोरोनाग्रस्त रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी संवेदनशील लोकांच्या सहकार्याने गेल्या वर्षभरापासून सातत्याने गरजवंताला मोफत प्राणवायू पुरवला जात आहे. आता नव्या रुपात आलेल्या कोरोना महामारीने उग्र स्वरूप धारण केलेले आहे. यामुळे सर्वांचीच जबाबदारी वाढलेली आहे.