संजय संगवई विचारपीठ नुतनीकरण

संजय संगवई विचारपीठ नुतनीकरण

विटा न्यायालयाचे न्यायाधीश सन्माननीय गौरवजी हंगे यांच्या हस्ते साथी संजय संगवई विचारपीठ नुतनीकरनाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. ऋषीकेत शेळके तहसीलदार, विटा उपस्थित होते. @क्रांतीवन 09042022...
Read More
संपतराव पवार यांना सेवासदन चा जीवनगौरव पुरस्कार….

संपतराव पवार यांना सेवासदन चा जीवनगौरव पुरस्कार….

सेवासदन मल्टीस्टेट हाॅस्पिटल व सेवासदन सोशल फाउंडेशनच्या वतीने बलवडीतील सामाजिक क्षेत्रातील उतुंग व्यक्तिमत्व असलेल्या संपतराव पवार यांना 'जीवनगौरव पुरस्कार' ने सन्मानित करण्यात आले. सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त नितिन कापडनीस यांच्या हस्ते देण्यात आले. मिरज हे आरोग्याची पंढरी म्हणून ओळखली जाते. अशा पंढरीत हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी डॉ.रविंद्र व्होरा, विलास चौथाई ,अंकुश नारायणकर,डॉ. रविकांत पाटील, डॉ. ससे इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते....
Read More
FIGHT AGAINST COVID

FIGHT AGAINST COVID

भाई संपतराव पवार व नितीनजी भिडे, पुणे यांच्या प्रेरणेने उगम फौंडेशन या संस्थेच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून बलवडी, जाधवनगर व तांदूळगाव परिसरात FIGHT AGAINST COVID हा उप्रकम राबवत आहोत. परिसरातील अत्यवस्थ कोरोनाग्रस्त रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी संवेदनशील  लोकांच्या सहकार्याने गेल्या वर्षभरापासून सातत्याने गरजवंताला मोफत प्राणवायू पुरवला जात आहे. आता नव्या रुपात आलेल्या कोरोना महामारीने उग्र स्वरूप धारण केलेले आहे. यामुळे सर्वांचीच जबाबदारी वाढलेली आहे....
Read More

जलनायक

आज जागतिक जल दिन... या निमित्ताने  दुष्काळ आणि पाणी प्रश्नावर झपाटून काम करणारे सांगली जिल्ह्यातील एक आदर्श लोक-नेतृत्व जलनायक संपतराव पवार यांच्या उगम फाउंडेशन या संस्थेला देणगी देण्याचे आवाहन दुष्काळी भागात चारा छावण्या व बळीराजा धरण, बाबा आमटे स्मृति टायर बंधारा, त्यातून अग्रणी नदीचे पुंनरुज्जीवन, लोक-सहभागातून कमी खर्चाचे सहा बंधारे घालून पाण्याची उपलब्धता वाढविणे, आजच्या जल-दिनी सरकारी मदतीशिवाय दुष्काळी भागात संपतरावांनी केलेल्या या कार्याची दखल समाजाने घ्यावी...  दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी BAP (Battle Against Poverty) प्रोजेक्ट द्वारे हिवतड गावात त्यांनी एक प्रयत्न यशस्वी राबविला असून शेतकरी सक्षम करण्यासाठी हा पथदर्शी प्रकल्प अनेक गावात राबवायचा आहे.. म्हणून त्यांच्या या संस्थेला आपण मनापासून भरघोस देणगी द्यावी यासाठी हा प्रयत्न... #GiveIndia या संस्थेच्या संकेतस्थळावर आपण ही देणगी देऊ शकता, क्लिक करा www.bit.ly/sampatrao अधिक महितीसाठी उगम फाउंडेशनच्या संकेतस्थळाला भेट द्या www.krantivan.com या मोहिमेला हातभार लावण्यासाठी हा इ-मेल आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा Suxes Consultancy या आमच्या कंपनीच्या वतीने Crowd Funding माध्यमातून अनेक प्रामाणिक सामाजिक संस्थांना निधी उभारणीत आमचा हातभार...
Read More
चारा छावणी उच्चाटन परियोजना 2021

चारा छावणी उच्चाटन परियोजना 2021

चारा छावणी उच्चाटन परियोजना अंतर्गत 10 एकरावर मका लागवड उपक्रम सुरू चारा निर्मितीचे कल्पक, बळीराजा धरणाचे प्रवर्तक, क्रांतिस्मृतिवनाचे निर्माते भाई संपतराव पवार यांच्या "छावणी मुक्त महाराष्ट्र" प्रकल्प...
Read More

राष्ट्रीय किसान दिनाच्या निमित्ताने संपतराव पवार यांच्याशी बातचीत…

शेतीसाठीच्या पायाभूत सुविधांचा खर्च सरकारने केला तर शेतीतील तोटा आटोक्यात येईल - संपतराव पवार संपतराव पवार हे सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागात तळागाळातल्या शेतकर्‍यांसाठी काम करणारे कार्यकर्ते. त्यांच्या परिसरातील शेतीप्रश्‍नांचा त्यांचा गाढा अभ्यासही आहे. शेतकर्‍यांचे प्रत्यक्ष जमिनीवरचे प्रश्‍न त्यांनी अनुभवले आहेत; त्यासाठी लढेही उभारले आहेत. शेतीप्रश्‍नाबाबत देशभरात चर्चा सुरू असताना मातीत गाडून घेऊन काम करणार्‍या या ज्येष्ठ कार्यकर्त्याशी युनिक फीचर्सच्या पत्रकारांनी साधलेला संवाद. १) तुम्ही गेली पन्नासेक वर्षं शेती क्षेत्राशी निगडित आहात. स्वतः शेती करता आहातच, शिवाय शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर लढताही आहात. या सर्व काळात आपल्याकडच्या शेतीची परिस्थिती कितपत बदलत गेली, बिघडत गेली असं वाटतं? - शेतीतली परिस्थिती कशी बदलत गेली याचा विचार करायचा असेल तर आपल्याला शेतीच्या प्रवासाची दोन टप्प्यांमध्ये विभागणी करावी लागेल. हरितक्रांतीपूर्वी आणि हरितक्रांतीनंतर. हरितक्रांतीपूर्वीची शेती प्रामुख्याने श्रमाधारित होती. शिवाय बियाणांच्या वगैरे बाबतींत शेतकरी स्वयंपूर्ण होता. स्वतःच्या शेतातलं धान्यच पुढच्या वर्षीच्या बियाणांसाठी राखून ठेवलं जायचं. पण हरितक्रांतीनंतर एक नवी विकासनीती समोर आली. वाढत्या लोकसंख्येसाठी वाढीव उत्पादन मिळवण्याच्या चांगल्या उद्दिष्टाने ती राबवली गेली असं मानलं, तरी प्रत्यक्षात कालांतराने त्याचे अनेक दुष्परिणाम दिसू लागले....
Read More
Agrani River Rejuvenation gets Central Recognition Award

अग्रणी नदी पुंनरुज्जीवन - केंद्र सरकारचा राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर

सांगली जिल्ह्यातील अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवनाच्या कामास भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचा नदी पुनर्जीवनाचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. दीडशे वर्षापूर्वी वाहती नदी असलेली अग्रणी नदी लुप्त झालेली होती.भाई संपतराव पवार यांनी ही नदी पुनरुज्जीवित करण्याची कल्पना सर्वप्रथम मांडली. जलबीरादरीचे मा.सुनील जोशी यानी या कल्पनेला उचलून धरले. मा. विलास चौथाई व भाई संपतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बलवडी व बेणापूर गावच्या लोकांनी लोकवर्गणीतून धरणे बांधून अग्रणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. पुढे मा.शेखरजी गायकवाड यानी या उपक्रमात झोकून दिले आणि शासकीय खर्चातून हा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प यशस्वी केला. आज हजारो शेतकरी या प्रकल्पामुळे आनंदीत झाले आहेत.!! ...
Read More
Oxygen Machines provided to Corono Patients free of cost

कोविड साथीच्या काळात रुग्णांना ऑक्सिजन मशीनची मदत

Ugam Foundation bought 3 Oxygen machines for Corona Patients in Sangali Rural areas. The recent spike in Corona patients in this unprecedented pandemic in Sangli, Kolhapur & pune region is seriously alarming. The patients have died because of the non-availability of beds. The rich can afford to buy Oxygen Machine but the poor patients who can not afford are unfortunately succumbing to death. Ugam Foundation has decided to help these poor patients by providing Oxygen Machines. Ugam Foundation is planning to buy these machines out of generous donations from supporters like you. Please donate for this cause. The donations are tax free under 80-G. कम्युनिटी स्प्रेड सुरू झाला आहे कोरोना चा वेग वाढु लागला आहे घराच्या बाहेर जाणे टाळा मास्क, सँनिटायझर, सोशल डिस्टंशन पाळा कीतीही महत्त्वाचे काम असले तरीही बाहेर पडून आपला व आपल्या कुटुंबाचा जीव टांगणीला लावू नका .... सप्टेंबर पर्यंत कम्युनिटी स्प्रेड चा जास्त धोका आहे.... काळजी घ्या.... कोरोना ला हलक्यात घेऊ नका.... जिल्ह्यात पुढील 15 दिवस हॉस्पिटलमध्ये एकही बेड शिल्लक नाही.... 5000...
Read More
Renewable Energy Practical Training Centre in Krantivan

क्रांतीवनात अपारंपरिक ऊर्जा प्रात्यक्षिक केंद्र सुरू होत आहे

Director of Science & Technology Park, Pune, Dr Rajendra Jagdale has donated Renewable Energy Training equipment to Ugam Foundation, the equipment costed Rs 15 to 16 Lacs. Under his guidance, Ugam Foundation will use these equipment in Kranti Smruti Van to start Practical Training Centre "Mahatma Viththal Ramji Shinde Memorial Renewable Energy Centre". This centre will be boon for rural srudents. We thank Dr Rajendra Jagdale...
Read More
Cluster Farming Workshop conducted in Krantivan

क्रांति-वनात क्लस्टर (गट-शेती) प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

Ugam Foundation conducted 3-day Group Farming Workshop recently in Kranti-Smriti-Van under Prime Minister Skill Development Programme & in association with Chhatrapati Rajaram Maharaj Entrepreneurship & Skills Development Scheme (MSDP Circle).Ex-Charman of APMC Sushant Deokar, Sarpanch Pravin Powar, Deputy Sarpanch Prasad Pawar & other social digitaries like Sangram Jadhav, Manohar Chavan & Prof Vishwanath Gaikwad were present श्री. देवकर म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची गटशेतीतून आर्थिक व सामाजिक प्रगती साधण्यासाठी हे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. या प्रशिक्षणातून लहान शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत होणार आहे. तसेच शेतकऱ्यांचा गट स्थापन करुन कंपनी निर्माण करण्यासाठी प्रयत्न या प्रशिक्षणातून होणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी जास्तीतजास्त या प्रशिक्षणात सहभाग घेऊन संपतराव पवार म्हणाले महाराष्ट्रात सर्वत्र हे प्रशिक्षण मंडल स्तरावर घेण्यात येत आहे. समुह शेती, गटशेती माध्यमातून उस व द्राक्षे उत्पादकांना पोषक व शेतीमध्ये प्रगती करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. लहान शेतकरी हा सदन व सक्षम व्हावा शेतीमध्ये आधुनिकता आणून शेतीमध्ये आर्थिकदृष्ट्या प्रगती साधण्यासाठी हे प्रशिक्षण घेतले आहे. गावागावामध्ये शेतीसाठी या प्रशिक्षणातून एकात्मता साधली जात आहे. संघटीत होवून शेती केल्यास आपली...
Read More